Top News

आईच्या हाकेला मुलांनी दिली साद.....

दहा मित्रांचे पहिल्यांदा रक्तदान.

स्वेच्छा रक्तदान शिबिराचा २१ वा दिवस.

आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवाराचा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मनुष्य जन्माला आल्यावर घरी आई कडून प्रथमतः संस्कारित होतो.नंतर तो समाजातून संस्कारित होत असतो.आणि समाजात काही अशाही मातृशक्ती असतात ज्या आपल्या मुलांसह इतरांच्या मुलांवरही,त्यांचे अनपेक्षितपणे पालकत्व स्विकारुन त्यांचेवर संस्कार करीत असतात.आणि मग ती त्या सर्व मुलांची आई होते.वात्सल्य सिंधू या आईने हाक दिली की ते सज्ज असतात तिच्यासाठी.असाच काहीसा प्रकार शनिवारी १९ जून ला आ सुधीरभाऊ मुनगंटीवार मित्र परिवार तर्फे आयोजित स्वेच्छा रक्तदान शिबिरात घडला.योग प्रशिक्षक वंदना संतोषवार यांचे चिरंजीव अनिकेत व कन्यारत्न आसावरी यांनी आपल्या ८ बालमित्रांसह येऊन पहिल्यांदा आई( सौ.वंदना )च्या उपस्थित रक्तदान केले.
भाजपा ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वंदना संतोषवार यांच्या अध्यक्षतेत शनिवारला रक्तदान पार पडले.या बोलतांना,वंदना संतोषवार म्हणाल्या रुपेश जीवतोडे,प्रवीण नैताम,अंकुश कोडपे,कुसुमाकर मेश्राम,कौशिक टेप्पलवार,निखिल उपरे,संकेत सामृतकर व रोशन नन्नावरे ही मुलं बालपणापासून अनिकेत व आसावरीचे मित्र आहेत.ही सर्व मुलं ५ वर्षाची होती तेव्हा पासून घरी येतात आणि मी सांगेल ते ऐकतात.रक्तदानाचा विषय सांगितला तर सर्वांनी मिळून ठरवलं.आणि पहिल्यांदा रक्तदान केलं.यांचं माझ्यावर खूप प्रेम आहे.मी यांची  जणू आईच आहे.असे म्हणून काही क्षण त्या स्तब्ध झाल्या.आईच्या समोर रक्तदान,खरंच हा अनमोल क्षण आहे.सभागृहात उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या प्रसंगाचे स्वागत केले.आईच्या हाकेला मुलांनी साद दिली हे तेव्हढेच खरे.
यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्रीराजेंद्र गांधी,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,शिबिर संयोजक प्रशांत विघ्नेश्वर,भाजपा सचिव रामकुमार अकापेलिवार, महिला मोर्चा महामंत्री शिला चव्हाण,सपना नामपल्लीवार, उपाध्यक्ष प्रभा गुढडे,ओबीसी नेते विनोद शेरकी,शशिकांत मस्के,महेश कोलावार,मयूर चहारे यांची उपस्थिती होती.
संतोषवार म्हणाल्या,माझ्या मार्गदर्शनात पहिल्यांदा रक्तदान करणाऱ्या या मुलांची २महिन्यांनी पोलीस भरती परीक्षा आहे.आता रक्तदानामुळे नवीन रक्त तयार होईल.त्यांच्यात उत्साह संचारेल,आणि हे सर्व उत्तीर्ण होतील.असा आशीर्वाद त्यांनी युवकांना दिला.कोरोनाच्या संकटात युवकांनीं  स्वयंस्फूर्त रक्तदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी सर्व युवा रक्तदात्यांना आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वतीने मान्यवरांच्या हस्ते भेट स्वरूप फेस शिल्ड,सन्मानपत्र व रक्तदानाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.तर शशिकांत मस्के यांनी आभार मानले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने रक्तसंकलन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने