💻

💻

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

पोंभूर्णा मनसे पदाधिकाऱ्यांनी केला सफाई कामगारांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- मनसेचे संस्थापक अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा 53 वा वाढदिवस पोंभूर्णा येथे मनसे पदाधिकाऱ्यांकडून मनसेचे जिल्हासचिव किशोरभाऊ मडगुलवार (बल्लारपूर विधाणसभा) यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
राजसाहेबांच्या आदेशाचे पालन करीत शासकिय नियमाचे उल्लंघन न करता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम ग्रामीण रूग्णालय पोंभूर्णा येथील डॉक्टरर्स, परीचारीका, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार यांचा शाल श्रीफळ, मिठाई देऊन सत्कार करण्यात आला. नंतर नगर पंचायतचे सफाई कामगार यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

कोरोना परीस्थिती लक्षात घेता संपूर्ण शहरात मास्क व सॉनिटायझर वितरीत करण्यात आले. राजसाहेबांचा 53 वा वाढदिवस असल्याने 53 किलो साखर वितरीत करण्यात आली.
जनसंपर्क कार्यालय पोंभूर्णा येथे केक कापून वाढदिवसाची सांगता करण्यात आली. यावेळेस मनसेचे जिल्हासचिव किशोर मडगुलवार, मनसेचे रूग्नमित्र क्रिष्णा गुप्ता, रूग्नमित्र प्रविण शेवते, मनसेचे पोंभूर्णा तालूकाध्यक्ष आकाश तिरूपतीवार, मनविसे तालूकाध्यक्ष आशिष नैताम, मनसे शहराध्यक्ष निखील कन्नाके, तालूका सचिव अमोल ढोले, मनविसे उपाध्यक्ष राजु गेडाम, आशिष राजु नैताम, निखील नैताम, राजू नवरत्ने आदी मनसैनिक प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत