🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

विवाहितेची विहिरीत उड़ी मारून आत्महत्या?(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) कु. पौर्णिमा फाले, सावली
सावली:- सावली तालुक्यातील अंतरगांव येथील एका विवाहित तरुणीने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पुढे आलेली आहे.
अंतरगांव येथील भूमिका प्रशांत ठाकरे वय 25 वर्ष असे मृतक महिलेचे नाव असून तिचे 4 वर्षा पूर्वी च लग्न झाले होते. दिनांक 14 ला दिवस भर शेतात काम केल्या नंतर सायंकाळी सर्वांचे स्वयंपाक बनवून शौचास जातो म्हणून ति टमरेल घेवून बाहेर गेली. मात्र बराच वेळ होवून ही भूमिका अजूनही आलेली नाही म्हणून तीचा सर्वत्र शोध घेतला असता जवळ असलेल्या विहिरीजवळ टमरेल दिसला त्यामुळे विहिरी तर नसेल म्हणून गळ टाकून पहिले असता साडी लागली.
सदर घटनेची माहिती पाथरी पोलिसांना देण्यात आली त्यावरून आज ठानेदार बंसोड़ हे स्वतहा घटनास्थळी येवून पाहणी केली व घटनेचा पंचनामा केला. सदर घटनेची चौकशी सुरु असून भूमिकाने आत्महत्या का केली हे मात्र अजुन ही कळलेले नसून पाथरी पोलिस पुढील तपास करित आहे.