सामाजिक बांधीलकी जोपासण्याचा अनोखा उपक्रम.
मुल:- आज संपूर्ण देशावर कोरोना माहामारीचे सावट पसरलेले आहे.सगडीकडे कोरोना रुग्णाची संख्या झपाटयाने वाढत आहे.अशा परिस्थितित प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य सुस्थितित राहावे ,कुटुंब सुरक्षित राहावे ही संकल्पना उराशि बाडगुन नाँदगाव येथील प्रसिद्ध व्यापारी आशीष चिल्वेलवार यानी संपूर्ण गावात प्रत्येक घरोघरी जाउन कुटुंबातील प्रत्येक सदस्याना मास्क चे वितरण केले.या कार्यात ग्रा.पंचायत चे उपसरपंच सागर देउरकर,तसेच प्रत्येक वॉर्डमधील ग्रा.सदस्य यानी सुधा सहकार्य केले तर मेघराज चुदरी, तन्मय मासावार, हेमंत बोरकूटे,यानीसुधा खुप कष्ट घेतलेत.
वरील कार्यक्रम यशस्वी केल्याबदल श्री माताजी मार्केटिंग चे व्यापारी आशीष चिल्वेलवार यानी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले.