जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

विरुर स्टेशन येथील आशाधाम हॉस्पिटला माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे 2 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर भेट.

माजी आमदार अँड संजय धोटे यांचा पुढाकार.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोविड19 मध्ये होणारी रुग्णाची गैर सोय तसेच विरुर स्टेशन येथील भाजपा पदाधिकारी माजी आमदार अँड संजय धोटे यांच्या कडे केलेली मागणी लक्षात घेता,माजी पालकमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या तर्फे विरुर स्टेशन येथील आशाधाम हॉस्पिटला 2 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर भेट देण्यात आल्या.


विरुर स्टेशन येथील पदाधिकारी यांनी मागील आठवड्यात माजी आमदार अँड संजय धोटे यांनी कोरोनाचा आजाराचा होणारा पादुर्भाव तसेच परिसरातील होणारी रुग्णाची गैरसोय ही बाब माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निदर्शनास आणून दिली, तसेच आशाधाम हॉस्पिटला 2 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर देण्याची त्यांनी मागणी केली होती, या मागणी दखल घेत माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर भेट दिले.
पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या सरकारला 7 वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून दिनांक 31 मे 2021 ला भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपाचे जेष्ठ नेते सतीश कोमरपल्लीवार व विरुर येथील भाजपा शहर अध्यक्ष भीमराव पाला, शामराव कस्तुरवार, यांच्या प्रमुख उपस्थितीत आशाधाम हॉस्पिटला 2 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर स्वाधीन करण्यात आले तसेच उपस्थित कर्मचारी यांना मास्क,व भेट वस्तू देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, भाजपचे जेष्ठ नेते सतीश कोमरपल्लीवाा, भाजपचे विरुर शहर अध्यक्ष भीमराव पाला,राजुरा तालुका भाजपा महामंत्री दिलीप वांढरे,सिस्टर एलिझावेल एन.,सिस्टर डॉ.एलिझावेल जोसफ, सिस्टर डॉ.जुटीड, सिस्टर अनुपमा भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर, शामराव कस्तुरवार, रघुनाथ बबीलवार, प्रदीप पाला आदी भाजपा पदाधिकारी तथा कर्मचारी वर्ग उपस्थित होते,आशाधाम हॉस्पिटल विरुर स्टेशन येथील डॉक्टर,आरोग्य कर्मचारी यांनी 2 ऑक्सिजन कॉन्‍स्‍ट्रेटर उपलब्ध करून दिल्या बद्दल माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व माजी आमदार अँड संजय धोटे यांचे आभार व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत