वाघाच्या हल्ल्यात 35 वर्षीय महिला ठार.

Bhairav Diwase


मुल:- मूल तालुक्यातील सुशी दाबगाव येथील रहिवासी वैशाली विलास मांदाळे हिला आज सकाळच्या सुमारास वाघाने ठार केल्याची घटना घडली.
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 1 जुन 2021 ला कक्ष क्रमांक 526 येथे वैशाली विलास मांदळे व तिच्या सोबत गावातील महिला काड्या तोडण्याकरिता गेली असता दबा धरून बसलेल्या वाघांनी हल्ला करून ठार केल्याची घटना आज सकाळी 7 वाजता च्या सुमारास घडली.
घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी व्हि. एल. पिंजारी, वनपरिक्षेत्र अधिकारी (Trening) प्रज्ञा कावेर, वनरक्षक मस्के वनपाल मडावी R.O ढोले दाखल झाले असून पंचनामा केला. पुढील तपास गदादे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे यांच्या मार्गदर्शनाखाली अकबरखाॅं पठाण करीत आहे.