आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिवती वनपरिक्षेत्राला 1 सॅनिटाॅयझर मशीनचे वितरण.

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- माजी अर्थमंत्री महाराष्ट्र लोखलेखा समितीचे अध्यक्ष आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून जिवती पंचायत समिती उपसभापती श्नी महेशभाऊ देवकते यांच्या वाढदिवसानिमित्त वनपरीक्षेत्र कार्यालय जिवती येथे सॅनिटायझर मशीन देण्यात आली. यावेळी जिवती पंचायत समितीचे उपसभापती श्नी महेश देवकते व जिल्हा परिषद सदस्या सौ. गोदावरीताई केंद्रे यांच्या हस्ते वनपाल श्री.सावसाखडे साहेब व वनरक्षक दत्ता जाधव विष्णू जी राठोड यांना प्रदान करण्यात आली. त्याप्रसंगी  जिल्हा उपाध्यक्ष भाजपा श्नी केशवराव गिरमाजी विमुक्त जाती जमाती चे जिल्हा संयोजक सुरेशदादा केंद्रे तालुका महामंत्री दत्ताभाऊ राठोड युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष गोविंदराव टोकरे सरपंच पुंडलिक गिरमाजी  विजय गोतावले भाजपा नेते गोपीनाथ चव्हाण निजम शेख माने जी अंकुश येमले आदी मान्यवर उपस्थित होते.