जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

भाजपच्या शिष्टमंडळाने घेतल्या ओबीसी संघटनांच्या नेत्यांच्या भेटी.

चक्काजाम आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिले निमंत्रण.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महाविकासआघाडी सरकारने घालवलेल्या ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्हा यांचेवतीने, येत्या शनिवारी दि. २६ जून २०२१ रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी 'चक्का जाम आंदोलन' करण्यात येणार आहे.
या पूर्वपार्श्वभूमीवर जिल्हा भाजपच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वामध्ये आज चंद्रपूर शहरातील ओबीसी समाजाच्या विविध संघटनांतील मान्यवर नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना चंद्रपूर तालुका व महानगर यांचेवतीने पडोली चौक (ता. जि. चंद्रपूर) येथे होणार्‍या आंदोलनास उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिलं.
यामध्ये सर्वश्री, डॉ. अशोकजी जिवतोडे, ॲड पुरुषोत्तमजी सातपुते, अॅड. दत्ताजी हजारे, बबनरावजी फंड, बबनरावजी वानखेडे, सुर्यकांतजी खनके, अनिलजी शिंदे आणि सचिनजी राजुरकर यांच्या भेटी घेऊन होणार्‍या आंदोलनात त्यांना सादर निमंत्रित केले.
यावेळी शिष्टमंडळात, भाजपचे महानगराध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, उपमहापौर राहूल पावडे, बल्लारपूर न. प. चे नगराध्यक्ष हरीशभैय्या शर्मा, जिल्हा महामंत्री नामदेव डाहूले, महानगराचे महामंत्री ब्रिजभुषण पाझारे, नगरसेवक विशाल निंबाळकर, इंजि. सुभाष कासनगोट्टूवार, महानगराचे अनु. जाती मोर्चाचे अध्यक्ष धनराज कोवे, शहर सचिव रामकुमार आकापेल्लिवार, ओबीसी मोर्चाचे महेश कोलावार, सत्यम गाणार आदिंसह भाजपचे इतरही पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत