🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

गोळी घालून सासऱ्याला संपवलं, सामाजिक कार्यकर्त्यांचा अज्ञातांकडून खून.


एकाच दिवसात 2 घटनांमुळे नागरिकांत खळबळ.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यात अहेरी येथे पोलीस दलात कार्यरत जवानाने कौटुंबिक वादातुन सास-याची गोळया घालून हत्या केली आहे. तर गडचिरोली शहरातही एका सामाजिक कार्यकर्त्याची हत्या झाली असून या दोन हत्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

अहेरीत गोळ्या झाडून हत्या.....
👇👇👇👇👇👇

गडचिरोली जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत असलेल्या मनोज गाावडे यांचेे लग्न चामोर्शी येथील मारोती मट्टामी यांच्या मुुुुलीसोबत झालं होतं. जावई आणि मुलगी यांच्यात वाद सुरु असल्याने मारोती मट्टामी मुलीकडे भेटायला आले होते. जावई मनोज गावडे आणि सासरा यांच्यातील वाद विकोपाला जाऊन रागाच्या भरात मनोज गावडे याने आपल्याकडे असलेल्या बंदुकीतुन सास-यावर गोळया झाडल्या. त्यात सास-याचा जागीत मृत्यू झाला आहे. मध्यरात्री हा प्रकार घडला. बंदुकीच्या गोळीचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिक गोळा झाले होते. दरम्यान पोलीस शिपाई मनोज गावडेला पोलिसांनी अटक केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

गडचिरोलीतल आणखी एक हत्या...
👇👇👇👇👇👇

दरम्यान गडचिरोली शहरातही सामाजिक कार्यकर्ते दुर्योधन रायपुरे यांची अज्ञात मारेक-यांनी हत्या केल्याचे समोर आले आहे. दुर्योधन रायपुरे हे गडचिरोली शहराच्या फुले वॉर्डमध्ये राहत होते. शहरातील सामाजिक कामात त्यांचा पुढाकार होता. काल रात्री जेवण करुन घरात झोपले होते. आज सकाळी त्यांच्या घराचं दार उघडं आढळल्याने नातेवाईकानी घरात जाऊन पाहिले. यावेळी त्यांचा मृतदेह खाटेवर पडून असलेला आढळला. त्या ठिकाणची परिस्थिती पाहता त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनी लगेच घटनेची माहिती गडचिरोली शहर पोलिसांना कळवली. या घटनेची माहिती मिळत पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा आणि प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. पोलिसांचे श्वान पथक घराच्या चारही बाजूने फिरुन आले. त्यानंतर आरमोरी मार्गाकडे जाणा-या बायपास रस्त्यापर्यंतही शोध घेऊन आले. मात्र मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. पोलिसांनी आता या घटनेचा कसून तपास सुरू केला आहे. सामाजिक कार्यकर्ते रायपुरेंच्या हत्येने शहरात खळबळ उडाली आहे.