🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

श्रीमती शोभाताई फडणवीस हे चंद्रपुर जिल्ह्यातील आदर्श व्यक्तिमत्त्व- सौ. संध्या गुरनुले अध्यक्षा जि. प. चंद्रपुर

१६ महिने तुरुंगवास भोगलेल्या श्रीमती शोभाताई फडणवीस यांचा तुरुंगातील प्रवास ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
मूल:- चंद्रपुर जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या जेष्ठ नेत्या, माजी पालकमंत्री, माजी आमदार श्रीमती शोभाताई फडणवीस यांचा १९७५ राष्ट्रीय आणीबाणी च्या काळात आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
१९७५ च्या राष्ट्रीय आणीबाणी च्या काळात तुरुंगवास भोगलेल्या मिसाबंदी चा सत्कार जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज करण्यात येत आहे. या आणिबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेले अनेक जनसंघाचे नेते, कार्यकर्ते काही हयात आहेत तर काही निधन पावलेले आहेत. या सर्वांच्या घरी जाऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते शाल, श्रीफळ, सॅनिटायजर, वाफारा मशिन, सन्मान चिन्ह, देऊन आठवणींना उजाळा देत आहेत.
त्यांनी तुरुंगवास भोगले, त्या काळामध्ये लोकशाही चा खून झाला होता. त्याचा विरोध म्हणून आपलं स्वतःच घर दार सोडून त्यांना सरकारने तुरुंगवासात रवानगी केली. आज यांच्यामुळेच लोकशाही जिवंत आहे. त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात येत आहे.


त्यातच या आणीबाणी मध्ये चंद्रपुर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील श्रीमती शोभाताई फडणवीस या सुद्धा सामील होत्या. म्हणून चंद्रपुर जिल्ह्याच्या जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले यांनी स्वतः घरी जाऊन शोभाताई चा सत्कार केल्या. यावेळी त्यांनी मिसा बंदीच्या काळात आठवणीना उजाळा देत असताना त्या भावना विवश झाल्या होत्या. त्यांनी सांगितलेले एकूणच कथन ऐकून उपस्थितांचे सुद्धा डोळे पाणावले.
यावेळी उपस्थित श्री. नंदू रणदिवे उपनगराध्यक्ष नगर परिषद मूल, प्रशांत समर्थ नगरसेवक, प्रशांत लाडवे, किशोर कापगते, महेंद्र दरकाडे, बबन गुंडावार, अनिल संतोषवार, राकेश ठाकरे व कार्यकर्ते उपस्थित होते.