प्रधान डाकघर पाण्याची टाकी ऑटोरिक्षा स्टॅन्डवर लाईन सिस्टमला सुरूवात.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र ऑटो रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने दि . २४ जून २०२१ रोजी प्रधान डाकघर पाण्याची टाकी ऑटोरिक्षा स्टॅड येथे ऑटोरिक्षा प्रवास करतांना प्रवाश्याना प्रवास करतांना अडचण जाऊ नये व त्रास होउ नये या उद्देशाने ऑटोरिक्षा स्टॅड वर प्रवासी वाहतुक करणाऱ्या सर्व ऑटोरिक्षा चालक एकत्रित होऊन ऑटोरिक्षा स्टॅडवर लाईन सिस्टम सुरू करण्यात आली.
या कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, अध्यक्ष मधुकर राऊत, विलास बावणे, स्टॅडचे अध्यक्ष मुशीर शेख, सुनिल कोसरे, अजय नंदरधने, सुनिल भेदुरकर, सुधीर चौधरी, वासूदेव भेदुरकर, देवराव सोनोणे, अनिल मिसाळ यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर यांचा हस्ते हिरवी झेंडी दाखवून लाईन सिस्टमची सुरूवात करण्यात आली. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता प्रधान डाकघर ऑटोरिक्षा स्टॅड वरील सर्व ऑटोरिक्षा चालकांनी अथक परीश्रम केले.