Top News

नोकरीचे आमिष दाखवून ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश.


आरोपीला सूरत येथून अटक करण्यात सायबर सेल वर्धाला यश.

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
वर्धा:- फिर्यादी कु. तनया विनायकराव श्रीराव, रा. धनोडी (बहा), ता. आर्वी जि. वर्धा यांनी त्यांना नोकरीची आवश्यकता असल्याने क्वीकर या साइटवर नोकरी करीता त्यांची माहिती अपलोड केली असता फिर्यादी यांना त्यांच्या ईमेलवर प्रेलिक्स टेक्नॉलॉजी कडुन नोकरीबाबत ई-मेल प्राप्त झाला व फिर्यादी यांना कागदपत्रे पाठविण्यास सांगितले व काही दिवसाने वेगवेगळया मोबाईल नंबरवरुन कॉल करुन नोकरी देण्याचे आश्वासन देवून वेळोवेळी ऑनलाईन गूगल-पे द्वारे पैसे भरण्यास सांगितल्याने फिर्यादी यांनी एकुण २,३९,०००/- रु. भरले.

परंतु कोणतीही नोकरी न दिल्याने फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन आर्वी येथे दिलेल्या रिपोर्टवरून दि. 28 मे 2021 रोजी अप क्र. ४०७/२०२१ कलम ४२० भादंवि सहकलम ६६ (ड) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास सायबर सेल, वर्धा मार्फत करण्यात आला असून सदर गुन्ह्यामध्ये तांत्रिक माहिती काढण्यात आली व मिळालेल्या तांत्रिक माहितीवरून आरोपी हे जिल्हा सूरत राज्य गुजरात येथील असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी १) रोहित रमेशभाई टोपलीवाला, वय २६ वर्ष, रा. सुरत याने स्वतःचे नावाने कनेक्शन नेटवर्क अशी बनावट कंपनी बनवली होती तसेच आरोपी क्रमांक २) विक्की अशोकभाई पोमला, वय २० वर्ष, रा. अंबिका नगर सोसायटी, रामनगर, सूरत याने स्वतःचे नावाने मेगास्टार सोल्यूशन अशी बनावट कंपनी बनवली व या कंपनीद्वारे नोकरीचे आमिष दाखवून सदर दोन्ही आरोपी हे लोकांची फसवणूक करीत होते.

सदर दोन्ही आरोपीतांवर सलग ५ दिवस पाळत ठेऊन दि. 23 मे 2021 रोजी वरील दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून आरोपी क्रमांक १) रोहित टोपलीवाला याचे घरून कॉल सेंटर चालविणे करीता वापरण्यात येत असलेले १ अँड्रॉइड मोबाईल व १० साधे मोबाईल एकूण किंमत १०,०००/- रु. जप्त करून गुन्हा उघडकीस आणला. वर नमूद गुन्ह्याचा सुरत येथे तपास करीत असतांना अहमदाबाद राज्य गुजरात येथील सायबर सेलला पाहिजे असलेला आरोपी यश विश्वकर्मा, रा, नानपुरा, सुरत हा सायबर सेल वर्धा यांना मिळून आल्याने सदर आरोपीस सायबर सेल अहमदाबाद यांचे स्वाधीन करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री निलेश ब्राम्हणे यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनि. गोपाल ढोले, पोलीस अंमलदार विशाल मडावी, अनुप कावळे, अंकित जिभे, राजू राऊत, प्रदिप दातारकर व सायबर पथक यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने