Top News

काँग्रेसने देशात आणीबाणी लादून लोकशाहीचा खून करण्याचे पातक केले:- जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे.

आणीबाणीच्या निषेधार्थ घुग्घुस भाजपाने पाळला काळा दिन.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- शुक्रवार 25 जून रोजी सकाळी 10 वाजता घुग्घुस येथील गांधी चौकात भारतीय जनता पार्टी घुग्घुस शहरातर्फे काळा दिवस पाळण्यात आला.
25 जून 1975 रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी सत्तेसाठी भारतीय लोकशाहीचा खून करण्याचा पातक केला आहे. अभिव्यक्तीची कलम रद्द केली, जीविताचा अधिकार संपविला, वर्तमान पत्रावर बंदी आणली. एवढेच नव्हे, तर अनेक लोकांचा अमानुष छळ केला गेला. वीस महिने तुरुंगात टाकले. पवित्र अशा संविधानाचा अवमान करत संपूर्ण देशाला हुकूमशाहीच्या काळ्याकुट्ट अंधारात ढकलणाऱ्या इंदिरा सरकारचा आणि सामान्य भारतीयांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या त्या आणीबाणीचा आम्ही निषेध करतो. यामध्ये जेल भोगलेल्या मीसाबंदी कार्यकर्त्यांकडून तत्कालीन व्यथा आणि इंदिरा सरकारचे हुकुमशाही धोरण ऐकून मनाचा त्रागा होतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून मिरविणाऱ्या भारतासाठी आजचा दिवस हा निश्चितच काळा दिवस आहे. म्हणून आज भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात 25 जून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जात आहे. असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
यावेळी, तत्कालिन सरकारचा निषेध करत या आणीबाणीत तुरुंगवास भोगून लोकशाहीच्या रक्षणार्थ लढलेल्या विरांना अभिवादनही करण्यात आले.
याप्रसंगी, गांधी चौकात भाजपच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फिती बांधून आणीबाणीच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करत निषेध व्यक्त केला.
याठिकाणी, भाजपा युवामोर्चा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, माजी जि.प. सभापती सौ. नितुताई चौधरी, नकोडा सरपंच श्री. किरण बांदूरकर, माजी पं.स. उपसभापती निरीक्षण तांड्रा, उत्तर भारतीय मोर्चा आघाडीचे संजय तिवारी, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, अमोल थेरे, माजी सरपंच राजकुमार गोडसेलवार, उत्तर भारतीय मोर्चाचे रत्नेश सिंग, माजी सरपंच पारस पिंपळकर, तालुका महामंत्री विजय आगरे, ग्रा. पं. सदस्य धानोरा विनोद खेवले, ग्रा. पं. सदस्य नकोडा कंपा राजय्या, माजी ग्रा. पं. सदस्या वैशाली ढवस, साजन गोहणे, भाजपा नेते बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, दिलीप कांबळे, रवी चुने, सुशील डांगे, सुनील राम, पांडुरंग थेरे, राजेश मोरपाका, विनोद जंजर्ला, राजू लुटे, गणेश खुटेमाटे आदींसह भाजपचे अनेक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने