दुचाकी-पिकॲपच्या धडकेत एक ठार.

Bhairav Diwase

यवतमाळ:- दुचाकी-पिक अप वाहनाच्या अपघातात एक जण जागीच ठार झाल्याची घटना वणी-वरोरा मार्गावरील अक्षरा ढाब्याजवळ दि. 03 जुन ला घटना घडली. निलेश नामदेव मिलमीले (३२) रा.बोमठाणा भद्रावती असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, निलेश मिलमीले यांची पत्नी वणी तालुक्यातील कुरई येथिल असुन ति 4-5 दिवसापासून माहेरी गेली होती. निलेश गुरुवारी दि. ३ जुन रोजी सासुरवाडीला जाण्याकरिता आपल्या दुचाकी क्र. MH-29 BG 6129 ने सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास वणी मार्गाने निघाला असता सावर्ला जवळील अक्षरा ढाब्याजवळ वणी कडुन भरधाव येत असलेल्या पिक अप वाहन क्र. MH-29 BE 0238 ने जोरदार धडक दिली या अपघातात निलेश नामदेव मिलमीले यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती वणी पोलीसांना मिळताच घटनास्थळी पोहोचले व घटना पंचनामा करून मृत्युदेह वणीच्या ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात करीत दाखल केला असुन पुढिल तपास जमादार जगदिश बोरनारै करित आहे.