जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🖼️
🖼️🇮🇳
🇮🇳✌️

✌️

✌️


🎂 🎂🎂🙏🟥

60 वर्षीय वृध्द महिलेवर युवकाचा अत्याचार.


घुग्घुस:- मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 5:30 च्या दरम्यान घुग्घुस येथील शांतीनगर येथे राहणाऱ्या अंदाजे 60 वर्षीय महिला आपल्या घरामागे शौचास गेली असता तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.
या प्रकरणात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही महिला आपला नवरा, मुलगा आणि सुनेसोबत राहून उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरी करत होती.

याप्रकरणी घुग्घुस पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे याची माहिती पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिली असता पोलीस अधीक्षक,एसडिपीओ यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. व आरोपी विरुद्ध कलम 354 (A), 376 (1) व 506 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय मेघा गोखरे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत