Top News

भावी पिढीने वाचन संस्कृती जोपासावी:- प्रा. डॉ. परमानंद बावणकुळे.


(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स पोंभूर्णा येथे श्री. पी. एन. पानीकेर केरळ राज्यातील वाचन चळवळीचे जनक यांचा स्मृतिदिन राष्ट्रीय वाचन दिन म्हणून १९ जुन ला महाविद्यालयात साजरा करण्यात आला.


या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा चे मराठी विभाग प्रमुख तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली ते सिनेट सदस्य प्रा. डॉ. प्रमानंद बावनकुळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर हे उपस्थित होते.

डॉ. बावनकुळे सर यांनी वाचन दिनाचे महत्त्व समजावून सांगताना वाचनाने आपली आकलन शक्ती वाढते त्याचप्रमाणे निर्णय क्षमता प्रगल्भ होते आणि बरे वाईट यातील फरक कळतो हे समजावून सांगितले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वाचाल तर वाचाल ही संकल्पना स्पष्ट केली. वाचनाशिवाय गत्यंतर नाही आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात जर टिकायचे असेल तर वाचना कडे दुर्लक्ष करता येणार नाही हे समजावून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे ग्रंथालय विभाग प्रमुख श्री. सतीश पिसे यांनी केले तर आभार डॉ. मेघा कुलकर्णी मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून महाविद्यालय प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महाविद्यालयामध्ये एक तास ग्रंथांचे वाचन केले. कोरोना काळातील नियम लक्षात घेता प्रत्येकांनी विशिष्ट अंतर ठेवून आणि चेहऱ्यावर मुख पट्टीचा वापर करून हा कार्यक्रम आभासी पद्धतीने गुगल मिट च्या माध्यमातून साजरा करण्यात आला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने