Top News

चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स आणि चिंतामणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वाचन दिवस साजरा.


(आधार न्युज नेटवर्क मुख्य संपादक) भैरव दिवसे
पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स आणि चिंतामणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय वाचन दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पी.एफ.गुल्हाने चिंतामणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एच. पठाण हे प्रमुख वक्ते म्हणून होते यांनी दीप प्रज्वलित करून पी. एन. पनीकर यांना हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
पी. एन. पनिकर बद्दल बोलताना ते म्हणाले केरला येथे त्यांचा जन्म झाला ग्रंथालय संबंधित यांनी चळवळ केली आणि प्रत्येक गावागावांमध्ये ग्रंथालय स्थापन केले पी. एन. पनिकर यांची दखल आता निती आयोग ने घेतली आहे त्यांच्या स्मृती दिवस राष्ट्रीय वाचन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो विद्यार्थ्यांना ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली त्यांना ऑनलाईन बुक देण्यात आले
या कार्यक्रमात उपस्थित प्राध्यापक डॉ. शैलेंद्र गिरीपुंजे प्रा. उगेमुगे शीला नरवाडे प्रा.धर्मदास घोडेस्वार प्रा.ओम प्रकाश सोनवणे प्रा.नितीन उपरवत डॉ. मेश्राम मॅडम डॉ.नारनवरे सर कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक विजय बुधे चिंतामणी महाविद्यालयाचे आयोजक प्राध्यापक विरुटकर होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने