मनविसे तालूकाध्यक्ष आशिष नैताम यांनी गावातील समस्यांचे निराकारण करण्याची ग्रामसेवक, सरपंचाकडे केली होती मागणी.

Bhairav Diwase
मनसेच्या मागणीला यश.....
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. यावर प्रतिबंध करण्यासाठी केंद्र व राज्यशासन सर्वोतोपरी उपाययोजना करीत असून आपण आपली जबाबदारी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.
पोंभूर्णा तालूक्यातील बोर्डा बोरकर हे गाव गटग्रामपंचायत असून या ग्रामपंचायत अंतर्गत तिन गावे येतात या गावात स्वच्छ्ता रहावी कुणाच्याही आरोग्यास बाधा पोहचू नये, या निस्वार्थ हेतूने मनविसे पोंभूर्णा तालूकाध्यक्ष आशिष नैताम तथा मनविसे तालूका उपाध्यक्ष राजू गेडाम, मनविसे पोंभुर्णा तालूका सचिव नूतन नैताम, तालूका संघटक अंकुश बालाजी नैताम, आशिष राजु नैताम, किरन नैताम, निखील नैताम, श्रीधर कुनघाळकर, वैभव मेश्राम यांनी बोर्डा बोरकर चे ग्रामसेवक तथा सरपंच यांचेकडे गावातील समस्या निर्दशनास आणून देत गावात निरजंतुकरन फवारणी तथा नाल्यांची साफसफाई करावी अशी मागणी केली. या समस्येची दखल घेत ग्रामपंचायतनी गावात स्वच्छ्ता राबविण्यास सुरवात केली आहे.