जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏

🙏🏻

रिषभ दुपारे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसवांद सरपंच संघाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी निवड.(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर :छोटा नागपूर ता. जिल्हा. चंद्रपूर चे उपसरपंच रिषभ दुपारे यांची महाराष्ट्र राज्य ग्रामसवांद सरपंच संघाच्या जिल्हाअध्यक्षपदी निवड झाली असल्याचे नियुक्ती पत्र ग्रामसवांद सरपंच संघांचे प्रदेश अध्यक्ष अजिनाथ धामणे. उपाध्यक्ष प्रमोद भगत.सचिव विलास लांडगे यांनी दिले.
ग्रामसवांद सरपंच संघ महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायतीच्या सर्वागीन विकासाकरिता आपली संघटना काम करणार असून. संघटनेमार्फत सरपंच उपसरपंच सदस्य यांना त्यांचे अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देऊन शासनाच्या विविध योजना गावातील प्रत्येक घटकापर्यत पोहचविण्याचा मुख्य हेतू असल्याच रिषभ दुपारे यांनी सांगितले.
     
रिषभ दुपारे यांनी तरुण वयामध्ये आपल्या सामाजिक कार्याच्या जोरावर उपसरपंच होऊन. त्यांनी पंचक्रोशीमध्ये अनेक तरुण युवकांचे संघटन मजबूत केले आहे.त्यांचा स्वभाव काम करण्याची पद्धत अडचणीत असलेल्या लोकांच्या मदतीला धावून जाणे अशी त्यांची समाजा मध्ये ओळख असल्याने. जिल्हाअध्यक्ष पदाच्या कारकिर्दीमध्ये जिल्ह्यातील सरपंच उपसरपंच यांची मजबूत फळी तयार करून ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामपंचायती मध्ये राबवून सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याने रिषभ दुपारे यांच्या निवडीने आनंदाचे वातावरण निर्माण झाले झाले असून अनेकांनी त्यांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत