Click Here...👇👇👇

मृत्यूनंतर ही जात पंचायतीचा जाच; 7 लेकींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला खांदा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- जातपंचायतीच्या जाचामुळे 7 बहिणींना आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर शहरात उघडकीस आली आहे. चंद्रपूर शहरातील भंगाराम वॉर्ड येथील ही घटना आहे. काल या परिसरात राहणाऱ्या प्रकाश ओगले यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. प्रकाश ओगले यांच्या मृत्यूचा निरोप नातलगांना देण्यात आला मात्र काही तासातच गेल्या 15 वर्षांपासून प्रकाश ओगले भोगत असलेला जात पंचायतीचा बहिष्कार पुन्हा एकदा आड आला.

गोंधळी समाजाच्या प्रकाश ओगले यांची आर्थिक परिस्थिती अतिशय हलाखीची...पदरी 7 मुली आणि 2 मुलं..त्यामुळे त्यांना समाजातील समारंभ, लग्न ,कार्यक्रम यांना जाणं शक्य होत नव्हतं.
त्यामुळे समाजाने त्यांच्यावर बहिष्कार टाकला. आर्थिक दंड लावला, मात्र प्रकाश ओगले यांनी दंड भरला नाही आणि हा बहिष्कार त्यांच्या मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतर ही कायम राहिला. मात्र MPSC ची तयारी करणाऱ्या त्यांच्या जयश्री या मुलीने जात पंचायतीला सणसणीत चपराक लगावत, आपल्या वडिलांच्या पार्थिवाला खांदा देण्याचा निर्णय घेतला. व 7 लेकींनी वडिलांच्या पार्थिवाला खांदा दिला