उर्जानगर कोंडी/वेंडली येथे होणाऱ्या पाण्याची टंचाईची समस्या लवकरात लवकर मार्गी लावावी.

Bhairav Diwase
बळीराजा आता जागा हो या संघटनेतर्फे निवेदन सादर.


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आज दि. 24 मे 2021 रोज सोमवारला बळीराजा आता जागा हो संघटना तर्फे श्री.मुकुंदा आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली,नंदू भाऊ मोंढे सचिव, वैभव दादा नळे सदस्य प्रमुख, गजानन भाऊ सवडे, धीरज भाऊ दुर्योधन, ऊर्जानगर कोंडी /वेंडली येथे नियोजनबद्ध दररोज नळाला पाणी मिळण्याबाबतचे निवेदन सरपंच/सचिव ग्रामपंचायत उर्जानगर जि. चंद्रपूर मार्फत संवर्ग विकास अधिकारी पं. स. चंद्रपूर तथा मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांना देण्यात आले.
ऊर्जानगर ग्रामपंचायतीमध्ये तांत्रिक दृष्ट्या पाईपलाईन टाकल्या न गेल्यामुळे किंवा नियोजनबद्ध काम न केल्यामुळे अनेक दिवसापासून नळाला पाणी येणे बंद आहे म्हणून योग्य उपाययोजना करून नियोजनबद्ध दररोज पाणी देण्याची व्यवस्था संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायती मधील वॉर्डांमध्ये काही लोकांनी योग्य भरणा भरून घरी दोन ते अडीच वर्षाच्या आधी नळे घेतले होते परंतु शोकांतिका अशी आहे की आजपर्यंत त्यांच्या नळाला एक थेंब सुद्धा पाणी आलेले नाही. अनेकदा लेखी व तोंडी तक्रार करूनही ग्रामपंचायतीचे लक्ष नाही त्यामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर या मूलभूत गरजांकडे लक्ष देऊन कुत्रिम अडचणी एक महिन्यात सुरळीत कराव्यात अन्यथा निरउपास्तव आंदोलन करावे लागेल याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. म्हणून वरील बाबीकडे लक्ष वेधून लवकरात लवकर यावर उपाययोजना करावे ही विनंती निवेदन पंचायत समिती, ग्रामपंचायत ऊर्जानगर, जिल्हा परिषद चंद्रपूर, येथे देण्यात आले. त्याप्रसंगी शुभम मुकुंदराव आंबेकर, सुरभाऊ भाऊ शिरपूरकर, संकेत ठाकरे, आदित्य गिलबिले उपस्थित होते.