Top News

मोदी सरकारच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्त खामोना येथे मास्कचे वितरण करून स्वच्छता अभियान उपक्रम संपन्न.

स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा दृष्टीने सभापती सुनील उरकुडे यांचे मार्गदर्शन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- आदरणीय मोदींजींच्या सातव्या वर्षपूर्तीनिमित्य दिनांक 31/5 /2021 ला खामोना येथे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे याच्या प्रमुख उपस्थितीत स्वयंसहाय्यता महिला बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन, कोरोनाचा व म्युकोर्मोयकोसिस पासून बचावासाठी लसीकरण का बरं आवश्यक आहे आणि स्वच्छ सुंदर गाव व त्यात लोकसहभागाचे महत्व काय अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन व त्यानंतर मास्क वितरण करून स्वच्छता अभियान असे विविध समाजोपयोगी मार्गदर्शन व कार्यक्रम घेण्यात आले.


कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी नियमितपणे मास्कचा वापर करणे, दोन व्यक्तींमध्ये संपर्काच्या वेळी सुरक्षित अंतर राखणे, नियमित हात स्वच्छ ठेवणे यासोबतच कोरोना लसीकरणाबाबत ग्रामीण भागात असणारे गैरसमज दूर करण्यासाठी सारासार मार्गदर्शन करून कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व उपस्थित महिलांना पटवून दिले. सोबतच गावातील महिला स्वयंसहाय्यता गटाचा आढावा घेऊन गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या संधी ग्रामीण भागात कशा निर्माण होऊ शकतात याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मौजा खामोना येथे महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या ग्रामसंघासाठी इमारतीची मागणी महिलांनी केली असता त्यासाठी व्यक्तिशः प्रयत्न करणार असल्याचे सभापती सुनील उरकुडे यांनी म्हटले आहे.


याप्रसंगी ग्रामपंचायत खामोना येथील सरपंच हरिदास झाडे, ग्रामपंचायत उपसरपंच सौ. शारदा तलांडे, ग्रामपंचायत सदस्य मारोती शामराव चन्ने, सौ अलका दिलीप वैद्य, सौ. लक्ष्मी लोणारे, ग्रामसेवक मिलिंद देवगडे, आशा वर्कर सौ. सविता उरकुडे, सीआरपी श्रीमती जयश्री पावडे, खामोना येथील प्रतिष्ठित नागरिक रामदास गिरसावळे, बाबुराव चन्ने, तुळशीराम तलांडे, दिलीप गिरसावळे तसेच मोठ्या संख्येने महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या महिला तसेच गावातील इतर नागरिक तथा युवकवर्ग उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने