💻

💻

दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक.

अपघातात 3 ठार तर 1 जखमी.

कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावर घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- दुचाकीनी दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने 3 ठार तर 1 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास कोरपना-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पारडी येथील शिव मंदिर जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार, सुपर स्प्लेंडर (super spender) दुचाकी क्रमांक MH 34 N 5135 ही कोरपनाकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या यामाहा (Yamaha) दुचाकीला धडकली. यात सुपर स्प्लेंडर वरील बहादू लच्चू सोयाम (३७), विश्वास भुतडे (४०) रा. येलापुर व यामाहा दुचाकीवरील राजू अर्जुन सोलंकी (३४) रा. इदरवेल्ली हे जागीच ठार झाले.
मुस्तकीन शेख (१८) रां. इदरवेल्ली हा गंभीररित्या जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच कोरपना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहांना ग्रामीण रुग्णालयात उर्वरित तपासणीसाठी हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार अरुण गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलिस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत