आमदार साहेबांच्या गावात नालीचे सांडपाणी नागरिकांच्या घरात.

Bhairav Diwase
सरपंच, उपसरपंच, ग्राम सचिव यांचा निष्काळजी पणा नागरिकांच्या आरोग्यावर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील खिर्डी हे गाव आमदार सुभाष धोटे यांचे मूळ गाव आहे. तेथील समस्या मात्र जैसे थे आहे. यामुळे अनेक नागरिकांना याचा सामना करावा लागतो. गावालगत नाला वाहत असतो, त्या नाल्याचे बांधकाम व संरक्षण भिंतिचे काम झाले. गावातील नालीचे वाहत असलेले सांडपाणी हे संरक्षण भिंतीतून गावाच्या बाहेर काढायचे होते. त्या साठी ठेकेदाराने दोन मोठे पाईप लावून पाणी बाहेर काढण्याचे नियोजन सुद्धा केले, पण सरपंच, उपसरपंच, व ग्राम सचिव यांनी नालीचे बांधकाम करून पाण्याचा बंदोबस्त करू असे सांगितले.
पावसाळा समोर असताना तात्पुरते पाईप लावून सांडपाण्याची विल्हेवाट लावायला पाहिजे होती. पण तसं न करता पावसाळ्यात नालीचे बांधकाम करने कितपत योग्य? आता तर पावसाच्या पाण्याने चक्क लोकांच्या घरात सांडपाणी घुसले. घरा मध्ये एवढी दुर्गंधी पसरली की लोकांना घरात राहणे कठीण झाले. सरपंच, उपसरपंच, ग्राम सचिव यांना वारंवार सांगून सुद्धा या कडे दुर्लक्ष करत आहे. असा आरोप खिर्डी येथील नागरिकांनी केला. आमदार साहेबांच्या गावात अशी परिस्तिथी असेल तर बाकीच्या गावात काय हे न विचार केलेच बरे.