🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू.

गोंडपिपरी-चंद्रपूर महामार्गावर घटना.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गोंडपिपरी:- चंद्रपुर महामार्गावरील वनविभागाच्या तलावाजवळ अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला असून सदर घटना आज सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली.
गोंडपिपरी शहराला वन हद्द सीमा लागून असल्याने अनेक वन्यजीवांचा गावा लगतच असलेल्या वन तलावाजवळ वावर असतो. अशातच आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास गोंडपिपरी-चंद्रपूर महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने मार्गक्रमण करणाऱ्या चितळाला जबर धडक दिल्याने या धडकेत चितळाचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने धाव घेतली असून मृत्त चितळाला शवविच्छेदन करीता पशुवैद्यकीय रुग्णालयात नेण्यात आले असून अज्ञात वाहनाच्या शोध सुरू असल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत