🙏🙏


🟥
🟥✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

जहाल माओवादी हरीभुषणाचा जंगलात मृत्यू.


1 कोटींचं होत बक्षीस.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोलीच्या माओवादी प्रभावीत भागात जहाल माओवादी नेता हरिभुषणचा मृत्यू झाला आहे. त्याच्यावर एक कोटींचं बक्षीस होते. हरिभुषणला कोरोनाची लागण झाली होती. गेल्या 27 मेपासून चार जहाल माओवाद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हरिभुषण हा चार राज्याच्या माओवादी प्रभावित भागात सक्रीय होता. त्यामुळे त्याच्यावर दंडकारण्यात एक कोटीचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. सोमवारी सुकमा जिल्ह्याच्या जंगलात ह्रदयविकाराच्या धक्क्याने त्याचा मृत्यू झाल्याची पोलिसांची माहिती दिली. पोलीस दलावर हल्ल्यासह अनेक मोठ्या हिंसक घटनांमध्ये हरिभुषण सुत्रधार होता.
हरिभुषणच्या मृत्यूवर दंडकारण्यातल्या यंत्रणासह केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचे लक्ष आहे. हरिभुषणने काही वर्षांपूर्वी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात माओवाद्यांना प्रशिक्षण दिले होते. 25 वर्षांपासून हरिभुषण माओवादी चळवळीत सक्रीय होता.