Top News

थकबाकीदार ग्राहकांची होणार बत्ती गुल. Lite



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- महावितरण चंद्रपूर परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, शासकीय, पाणीपुरवठा योजना व पथदिव्यांची मार्च २०२० ते मार्च २०२१ पर्यंत २७५ कोटी ३६ लाख आणि मार्च २०२१- २०२२ वर्षातील मे २०२१ पर्यंत ७१ कोटी २० लाख असे एकूण थकबाकी ३४६ कोटी ६५ लाखांचे बिल थकीत आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम लवकरच सुरू करणार आहोत. त्यामुळे वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता सुनिल देशपांडे यांनी केले आहे. ही बाब वीज ग्राहकांमध्ये धडकी भरविणारी असल्याचे बोलले जात आहे.
चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील घरगुती ग्राहकांकडून ४१ कोटी ३८ लाख ३२ तर मागील वर्षातील ३२ कोटी ८४ लाख थकीत आहे, वाणिज्यिक गाहकांकडून चालू वर्षात ८ कोटी ९२ लाख, गतवर्षातील ६ कोटी ७७ लाख बाकी आहे.

      औद्योग्गिक ग्राहकांकडून नवीन वर्षे ६ कोटी ३ लाख व जुने ३ कोटी ७० लाख, सरकारी कार्यालय व इतर लघूदाब ग्राहकांकडून २ कोटी ७४ लाख व गतवर्षातील ४ कोटी ३६ लाख, पाणीपुरवठा योजनांकडे एक कोटी ४८ लाख व गतवर्षातील २ कोटी ९७ लाख, शहरी व ग्रामीण पथदिव्यांच्या वीजबिलापोटी नगरपालिका व ग्रामपंचायतींचे या वर्षातील १३ कोटी ७ लाख व नवीन वर्षातील २२२ कोटी ३९ लाख थकबाकी आहे. तातडीने बिल भरावे, यासाठी मोबाईलवरून संदेश तसेच लेखी नोटीस पाठविण्यात आल्या. नोटीसांची मुदतही आता संपली आहे.
शासकीय विभागांकडेच कोट्यवधी थकीत.......

सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, पथदिवे, शासकीय कार्यालये, नगरपालिका, स्वराज्य संस्था व तत्सम शासकीय विभागाकडेच कोट्यवधींचे वीजबिल थकीत आहे. थकबाकीबाबत महावितरण अधिकाऱ्यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन वीज बिल भरण्याची माहिती दिली. जि. प. उपमुख कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांनी गट विकास अधिकाऱ्यांना थकबाकी भरणा करण्याबाबत १६ जून २०२१ रोजी पत्र दिले. मात्र बिल भरण्यात आले नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने