(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील पंचायत समितीच्या माध्यमातून 15 वित्त योजने अंतर्गत काही विकास कामे मंजूर करण्यात आले.त्या कामाचे भूमिपूजन जिवती पंचायत समितीचे उपसभापती महेशजी देवकते यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यातील शेणगाव पंचायत समिती सर्कल मधील टेकाअर्जुनी येथील मल्लिनाथ बाबा शिवमंदिर परिसरात, टेकामांडवा येथील दिगंबर रुजे यांच्या घराजवळील चौक मध्ये,व चिखली (खुर्द) येथे हनुमंत मंदिर परिसरात आणि संत रोहिदास महाराज यांच्या मंदिर जवळ अश्या प्रकारे अनेक गावांमध्ये विकास कामे करण्यात येत आहेत.त्याचे आज भूमिपूजन करण्यात आले.
त्याप्रसंगी उपसभापती महेशजी देवकते, डॉ.बबन वारे,राजेश राठोड,विजय गोतावळे, उपसरपंच तुकाराम वारुलवाड, नारायण वाघमारे, ,देवीदास वारे, मनमथ वारे,सुधाकर राठोड, बालाजी बिरादार,दिगंबर रुंजे,एकनाथ लिंगनवड, आदी उपस्थित होते.
#Bhumipujan
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत