चनाखा येथे १००% लसीकरण उद्दिष्ट पूर्ण. #Vaccine

Bhairav Diwase
0
जिल्ह्यात ३ रे गाव ठरले चनाखा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- कोरोना 19 च्या प्रकोपाला दूर सारण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस अत्यावश्यक असल्याने,शासनाने गावागावात जनजागृती करुन युद्धपातळीवर लसीकरण मोहीम हाती घेतली,सुरुवातीला ब-याच अफवांवर विश्वास ठेवत लसीकरणास विरोध करणा-यांनी सुद्धा जनजागृतीमुळे लसीकरणास प्रतिसाद देत चनाखा येथे १००%लसिकरणाचे उद्दिष्ट दि.१७ जुलै २०२१ला पूर्ण करुन १)आनंदवन २)धिडसी पाठोपाठ १००% उद्दिष्ट पूर्ण करणारे जिल्ह्यात ३रे गाव चनाखा ठरले.
1)चनाखा गावाची एकूण लोकसंख्या - 1218 2)लस घेण्यास पात्र 18 ते 44 लोकसंख्या -427 3)18 ते 44 झालेले लसीकरण - 427       4)लस घेण्यास पात्र 44 ते वरील सर्व लोकसंख्या 538  
5) 44 ते वरील झालेले लसीकरण - 538
     लसीकरण १००% उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरपंच सौ.रेखाताई भाऊराव आकनुरवार,उपसरपंच श्री.विकास देवाडकर यांचेसह ग्रां.प.सदस्य राजेश सातपुते,सुनिता पांडुरंग सातपूते,प्रतिभा संतोष मडावी, प्रकाश दुर्योधन, ज्योत्सना ज्योतीबा वानखेडे,कार्यतत्पर ग्रामसेविका मंजुषा पारखी,आशा वर्कर श्रद्धा पंचभाई, जि.प.उच्च प्राथ.शाळा चनाखाचे मुख्याध्यापक श्री.भास्कर वाटेकर,मधुकर सत्रे,दिवाकर येलमूले,संदीप कोंडेकर, कान्होबा लांजेकर यांनी व परिचारिका विद्या जेऊरकर व कु.गिरडकर यांनी मोलाचे सहकार्य केले.
राजुरा पं.स.मध्ये जास्तीत जास्त लसीकरण उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संवर्ग विकास अधिकारी मान.डॉ.ओमप्रकाश रामावत साहेबांनी अधिकाधिक कँप लावणे,कर्मचारी यांना आधार देवून जनजागृतीसाठी प्रवृत्त करण्याचे बहुमोल कार्य केले बि.डी.ओ.साहेबांची लसीकरणासाठी धडपड व कडकड यामुळे हे उद्दिष्ट साध्य करता आल्याचे चनाखा चे उपसरपंच श्री.विकास देवाडकर यांनी व्यक्त केले.
 #Vaccine

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)