Top News

आई ती आईच! वाघाच्या जबड्यात 5 वर्षाच्या लेकीचं डोकं, जीवाची बाजी लावून केली सुटका. #Mother #tigerattack #chandrapur


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- आई आपल्या लेकरासाठी काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण आज चंद्रपूरमध्ये पाहण्यास मिळाले. शौचालयाला जात असताना वाघाने आई-लेकीवर हल्ला केला. वाघाने चिमुरडीवर झडप घातली पण आईने मोठ्या हिंमतीने लढा देऊन आपल्या लेकराची सुटका केली आणि दोघींचा जीवा वाचवला. #Mother #tigerattack #chandrapur
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून वाघांच्या हल्ल्याचा घटना वारंवार घडत आहे. शहरालगत असलेल्या जुनोना गावाजवळ राहणाऱ्या अर्चना मेश्राम आपल्या पाच वर्षाची लेक प्राजक्तासह बाहेर शौचालयाला गेल्या होत्या.
पण अचानक झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने पाच वर्षाच्या प्राजक्तावर वाघाने झडप घातली. चिमुकलीचे डोके वाघाने आपल्या जबड्यात पकडले होते. अर्चनांनी सुरुवातीला आरडाओरडा केला. मात्र वाघ मुलीला सोडत नसल्याचे बघून बाजूची काठी घेऊन त्यांनी वाघावर हल्ला केला.
पण मुलीला सोडून वाघाने अर्चना यांच्यावर हल्ला केला. मात्र मोठ्या हिंमतीने त्यांनी तो हल्ला परतून लावला. वाघ पुन्हा मुलीजवळ गेला. पुन्हा मुलीचे डोके जबड्यात पकडले. शेवटी अर्चना यांनी पूर्ण ताकदीनिशी वाघावर काठी घेऊन हल्ला केला. त्यांनतर वाघ घाबरून जंगलात निघून गेला.
जखमी मुलीला घेऊन अर्चना गावात आल्या आणि घडलेली सर्व हकीकत सांगितली. पुढे पतीच्या मदतीने मुलीला रुग्णालयात भरती केले. वाघाच्या हल्ल्यात या चिमुकलीच्या चेहऱ्याची हाडे तुटली आहे. चंद्रपूरला प्राथमिक उपचार झाल्यानंतर आज आईने आपल्या मुलीला नागपूर शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात तिला उपचारासाठी आणले आहे. आज या चिमुकलीचा जीव धोक्याबाहेर आहे. याचे आईच्या चेहऱ्यावर समाधान आहे.
सध्या प्राजक्ता धोक्याच्या बाहेर असली तरी वाघांच्या दातामुळे तिच्या चेहऱ्यांची हाडे तुटली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तिच्या शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने