18 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या. #Suicide

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील रहिवासी रोशन महादेव दडमल (वय 18) या युवकाने स्वतःच्या घरीच गळफास लावून आत्महत्त्या केल्याची घटना उघडकीस घडली.
विहिरगाव येथील टेलरिंग चा व्यवसाय करणाऱ्या महादेव दडमल यांचा तो एकलुता एक मुलगा होता. रोशन सायंकाळी घरातल्या एका खोलीत ऑनलाइन अभ्यास करीत होता. आज सकाळी 11 वाजता त्यांची आई आणि बाबा शेतावर गेले होते. घरी आल्यानंतर त्यांनी आवाज दिला असता दार आतून बंद असल्याने संशय आला. खिडकीतून डोकावून पाहिले असता रोशनने दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.घ रच्या लोकांनी पोलीस स्टेशनला याप्रकरणी माहिती दिली.
रोशनने आत्महत्त्या का केली, याचे नेमके कारण वृत्त लिहेपर्यंत समजले नाही. शवविच्छेदनासाठी प्रेत चिमूर येथे उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असून पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहेत. #Suicide