ऑनलाईन गिफ्टच्या आमिषापोटी 98 हजार गमावले. #fraud #Cybercrime

Bhairav Diwase

भंडारा:- ऑनलाइन फ्री ग्रिफ्ट च्या मागे लागाल तर पैसे गमवुन बसाल! मोबाइल वर फ्री गिफ्टचे मेसेज किंवा फोन येत असतील तर सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. कुपन स्क्रॅच करा फ्री गिफ्ट मिळवा. असे मेसेज किंवा फोन आजकाल आपल्या प्रत्येकाला कधी न कधी येत असतातच. #fraud #Cybercrime
मात्र अश्या भूलथापांना बळी पडून आपण स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतोय. अश्याच फ्री गिफ्टच्या अमिषापोटी भंडारा शहरातील तरुणीला एका भामट्याने तब्बल 98 हजार रुपयांचा गंडा घातला आहे.
भंडारा शहरात राहणाऱ्या दीपाली यांना अनोळखी इसमाने फोन करून तुम्ही शॉपिंग केल्याने तुम्हाला 5 हजार रूपयांचे गिफ्ट मिळणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला दिपालीला यावर विश्वास बसला नाही मात्र या भामट्याने अत्यंत चलाखीने व विश्वासात घेऊन 98 हजारांना गंडा घातला आहे.
तुम्हाला गिफ्ट मिळाले आहे असे अमिष देऊन या तरुणीला हा भामटा पैशांची मागणी करत होता. वेगवेगळ्या पद्धतीने तरुणीकडून 5 वेळा एकूण 98 हजार रूपये ऑनलाइन पद्धतीने काढून घेण्यात हा सायबर भामटा यशस्वी झाला आहे.
मात्र पैसे देऊनही गिफ्ट काही आले नाही. त्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित तरुणीने भंडारा शहर गाठत भंडारा पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे. गिफ्टच्या अमिषाला बळी पडून पीडित तरुणीने वारंवार पैसे भरले पण तिच्या हाती काही लागले नाही. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत असून सायबर सेलकडून वारंवार सूचना देण्यात येत असून देखील नागरिक याला बळी पडत असतील तर दुर्दैवच मानावे लागेल.