(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- येथील सावित्रीबाई फुले विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर चे माजी मुख्याध्यापक मारोती एकरे हे नियत वयोमानानुसार 30 जून रोजी सेवानिवृत्त झाले असून नवीन मुख्याध्यापक/प्राचार्य म्हणून कनिष्ठ महाविद्यालयात कार्यरत असलेले डी. आर.काळे यांना नियुक्ति मिळाली आहे. #Appointment
डी आर काळे मागील 29 वर्षापासून कनिष्ठ महाविद्यालय सेवारत होते. शिस्तप्रिय शिक्षक म्हणुन त्यांचे नाव लौकिक आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे शाळा महाविद्यालय शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळा महाविद्यालय नवीन नाव रुपास येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले विद्यालय,कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी नवनियुक्त मुख्याध्यापकाचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.