Top News

बांधकाम सभापती विलास विखार यांना जबर मारहाण. #Beating #Crime

शेतकऱ्यांच्या समस्या सोडविताना मध्यस्थी भोवली.

तीन आरोपी विरोधात गुन्हा दाखल.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपुर:- ब्रम्हपूरी शहरातील कुर्झा निवासी आणि ब्रम्हपुरी नगर परिषदेचे बांधकाम सभापती विलास विखार यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. 
सविस्तर माहिती काल रात्री च्या सुमारास कुर्झा येथील नगरसेवक विलास विखार यांच्या कडे काही शेतकरी धान विक्री बदल समस्या घेऊन आले. लोकप्रतिनिधी असल्याने समस्या निपटारा करण्यासाठी प्रयत्न केला.पण संबंधित धान्य व्यापारी मौजा कुर्झा येथील रजत रामकृष्ण थोटे यांनी सहा महीण्यापुर्वी दहा- पंधरा शेतकऱ्यांकडून २३००प्रति क्विंटल प्रमाणे धान खरेदी केले.पण रजत हा आता १८०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे धान्याचे पैसे शेतकऱ्यांना देत होता.पण शेतकऱ्याना २३०० प्रतिक्विंटल दर भाव पाहिजे असल्याने ते शेतकऱ्यांना मान्य नव्हते. #Beating #Crime
    यासाठी नगरसेवक विलास विखार हे रजत रामकृष्ण थोटे, रामकृष्ण थोटे, शुभम थोटे यांच्या कडे शेतकऱ्यांना घेऊन गेले असता. तु कोण आहेस असे बोलून रामकृष्ण थोटे यांनी नगरसेवक विलास विखार यांच्या डोक्यावर विटे ने जबर मारहाण केली. संबधित दोन्ही मुलांनी शिवागाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. डोक्यावर जबर मारहाण केल्याने नगरसेवक विलास विखार रक्तबंबाळ अवस्थेत ब्रम्हपूरी पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.सदर तक्रारी वरुन‌ तिन्ही आरोपी विरोधात कलम ३२४, ५०४, ५०६, ३४ अनन्वे गुन्हा दाखल करण्यात आला.सदर तपास पोलिस निरीक्षक रोशन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्य पोलिस निरीक्षक आशिष बोरकर करित आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने