गोविंदपूर पुलानजीक कच्चा रस्ता गेला वाहून. #road #bridge

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
गडचिरोली:- गडचिरोलीत काल मुसळधार पाऊस पडला. गडचिरोली-चामोर्शी महामार्गावर असलेला गोविंदपूर नाल्यावर नवीन पुलाचे बांधकाम सुरु असून वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेला पुलानजीक कच्चा रस्ता आज सकाळी वाहून गेला. त्यामुळे गडचिरोली-चामोर्शी या मुख्य मार्गाचा संपर्क तुटला आहे. #road #bridge #Gadchiroli
मध्यरात्री पासून गडचिरोली परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिकडे-तिकडे पाणीच पाणी झाले आहे. गडचिरोलीपासून 18 किमी अंतरावर असलेल्या गोविंदपूर गावानजीक असलेल्या नाल्यावर नवीन पुलाचे व सिमेंट रोडचे बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत सुरु असून त्यामुळे ठिकठिकाणी पुलाच्या बांधकामानजीक वाहतुकीसाठी कच्चा रस्ता बनविण्यात आलेला आहे.
गोविंदपूर परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने पुलानजीक असलेला हा कच्चा रस्ता वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे व अनेक गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)