आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सहकार्यातून भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा यांनी घेतला पुढाकार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यतील अतिशय मनमिळाऊ, प्रेमळ, अडचनीत सतत गोर गरीब जनतेला मदतीचा हात देऊन एका हाकेवर धाऊन जाणारे व भारतीय जनता पार्टीचे नम्र व खंदे व्यक्तिमत्व म्हणजे स्व. गजानन गोरंटीवार ज्यांनी आपली कारकिर्द भारतीय जनता पक्षाच्या सदैव सेवेत राहुन आ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रेरणा घेत पोभुर्णा तालुक्यात पक्षाची ताकत अधिकच घट्ट केली. अशा पोलादी व्यक्तिमत्वाच्या जन्मजयंतीनिमित्त काही तरी सत्कार्य आपल्या हातून करावे. व गजू भाऊ चे मदतीचे कार्य या रूपाने सतत सुरु राहावे, या उद्देशाने भारतीय जनता पार्टी पोंभुर्णाच्या वतीने भविका बाळु मडावी या आदिवासी विधवा महिलेला शिलाई मशीन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या उपजीविकिचा मार्ग मोकडा करुन दिला. #bjppombhurna
*🍾चंद्रपूर शहरात काल देशी दारू दुकानाचे थाटात उद्घाटन!*
👇👇👇👇👇👇
शिलाई मशीन मिळाल्याबद्दल भविका ताईंनी आनंद व्यक्त केला. यावेळी कु.अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी चंद्रपुर, ईश्वर नैताम भाजपा महामंत्री, रजिया कुरेशी सचिव महिला आघाडी, वैशाली बोलमवार शहर अध्यक्ष, राजू ठाकरे इ. उपस्थित होते.