जनरेटर गॅस गळतीने एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू. #death #durgapur #Chandrapur

Bhairav Diwase
0

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार चंद्रपूर शहरालगत दुर्गापूर येथे जनरेटर गॅस च्या गळतीने एकाच कुटुंबातील सहा सदस्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे. #death #durgapur #Chandrapur

बुरखा घालून आलेल्या युवकाच्या गोळीबारात एक युवक जखमी.

आज सकाळी दुर्गापूर परिसरातील वीज गेल्याने जनरेटर सूरू करून हे कुटुंब झोपले होते. त्यादरम्यान गॅस गळती होऊन ही घटना घडल्याचे शेजार्यांना निदर्शनास आले.
मात्र जनरेटर चा गँस गळतीने सहा जनांच्या मृतांमध्ये अजय लष्कर (२१), रमेश लष्कर (४५), लखन लष्कर (१०), कृष्णा लष्कर (८), पूजा लष्कर (१४), माधुरी लष्कर (२०) यांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी या कुटुंबात विवाह झाला होता. 

रात्री दुर्गापुरातील काही भागातील वीज पुरवठा गेल्याने रमेश यांनी जनरेटर सुरू केला, वीज न आल्याने जनरेटर सुरूच होता, रात्री पाऊस सुरू आल्याने जनरेटर सुद्धा घरातील आतील भागास ठेवण्यात आला असल्याने त्यामधून निघणारा धूर लष्कर कुटुंबासाठी जीवघेणे ठरले, त्या धुरामुळे 6 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. घटनेची माहिती कळताच दुर्गापूर पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल झाली. पुढील तपास सुरू आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)