भाजयुमो प्रदेशाध्यक्षांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यात भाजयुमोचे सेवा दिन. #Bjym #bjymchandrapur

Bhairav Diwase

भाजयुमोतर्फे चंद्रपूर जिल्ह्यात १०४० वृक्षांचे रोपण.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्राचे लोकनेते आ.सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गर्शनाखाली व भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळें यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात संपूर्ण २२ मंडळात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये विविध ठिकाणी ऐकून १०४० वृक्षांचे रोपण करण्यात आले. #Bjym #bjymchandrapur
तसेच भाजयुमोतर्फे जिल्ह्याभरात आजचा दिवस सेवा दिन म्हणून साजरा केला. यामध्ये अनेक ठिकाणी कोविड काळामध्ये फ्रंटलाईन वर्कर म्हणून सेवा देणाऱ्या सफाई कामगारांना फळवाटप करण्यात आले. तसेच काही ठिकाणी सत्कारे सुद्धा पार पडली. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा भाजयुमोचे सर्व महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव, मंडळ अध्यक्ष, इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सर्वांनी मेहनत घेतली.