वन अकादमी वनाधिकारीच्या बंगल्याच्या आवारात निघाला अजगर साप. #snake #snakenews

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपुर: काल रात्री वन अकादमी मधील वनाधिकारीच्या बंगल्याच्या आवारात ८-९ फुट लांबिचा आणि जवळपास २० kg वजनी भला मोठा अजगर साप आढळून आला. #snake #snakenews
सदर अजगर चंद्रपुर वनविभाग च्या विभागीय वनाधिकारी सारिका जगताप यांचे बंगल्याच्या आवारात होता. वनाधिकारी किंवा कर्मचारी वसाहत परिसरात इतका मोठा अजगर आढळून येण्याची ही पहिलीच घटना आहे. रात्रीच्या वेळेस सारिका जगताप याचे पती डीएफओ राम धोतरे आवारात फिरत असताना अगदी त्यांचे समोर साप दिसून आला. याची माहिती लगेच वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर यांना देण्यात आली.
आरएफओ कारेकर यांनी इको-प्रो चे सर्पमित्र बंडू धोतरे यांना माहिती दिली. लगेच इको-प्रो चे सदस्य जयेश बैनलवार आणि सचिन धोतरे यांचे सोबत फारेस्ट अकादमी जाऊन रात्री 10:30 वाजता अजगर रेस्क्यु करण्यात आला.
अजगर दिसल्यापासुन वाल कंपाउंड कड़े मोठ्या दगडात गेल्यानंतरही त्यावर विभागीय वनाधिकारी राम धोतरे आणि वनअकादमी चे अ. संचालक प्रशांत खाडे यांनी लक्ष ठेवून होते. वन अकादमी मधे नुकतेच बांधकाम झाले असून या बांधकाम मुळे आवारात असलेल्या दगड़ाखाली गेल्याने मोठी दगड हलवून रेस्क्यू करणे जिकरिचे झाले होते. वन अकादमी मधील वन मजूर, सुरक्षा रक्षक यांचे मदतीने सर्पमित्र यांनी सदर अजगर रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी झाले.
यानंतर सदर अजगर सापास रात्रिच लोहारा-जुनोना जंगलात सुरक्षितपणे वनपाल एन पी तावाडे, वनरक्षक एन के करकाडे यांच्या उपस्थितीत सोडण्यात आले.