भद्रावती तालुक्यातील विद्युत कनेक्शन तोडणे थांबवा. #Electricity

Bhairav Diwase
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसची मागणी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील व शहरातील विद्युत कनेक्शन तोडणे थांबविण्यात यावे अशी मागणी भद्रावती शहर राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस तर्फे शहर उपाध्यक्ष सूरज भेले यांनी राज्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली.
सूरज भेले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना काळात भद्रावती तालुक्यातील मोठ्या प्रमाणात मागासवर्गीय जनतेला कामधंदा नसल्याने विद्युत बिल भरण्यास दिरंगाई झाली आहे. ही जनता पूर्णपणे विज बिल भरु शकली नाही. म्हणून महावितरण कंपनीने कोणाचे चक्क मिटर काढून टाकले. तर कोणाचे खांबावरुन कनेक्शन तोडले. त्यामुळे आपण संबंधित अधिका-यांशी चर्चा करुन विज ग्राहकांना टप्प्या-टप्प्याने विज बिल भरण्याची सवलत द्यावी व विज पुरवठा बंद करु नये असे आदेश अधिका-यांना द्यावेत अशी मागणीही सूरज भेले यांनी निवेदनातून केली आहे.
 #Electricity