🙏🙏✍️ ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

दोन दिवसात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र टेकामांडवा येथिल रुग्णालयात डॉक्टर हजर करा अन्यथा जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय ताब्यात घेऊ. #Doctor

शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांच्या इशारा.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- आरोग्य विभागाच्या व ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे गेल्या अनेक कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेले टेकामांडवा येथिल प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अखेर सुरू झाले मात्र 'टेकामांडवा प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात शेळ्या-मेंढ्यां बांधत होते या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांनी१५ दिवसांच्या आत टेकामांडवा येथिल आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित न झाल्यास मुर्दा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिला होता यांची दखल घेत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी दिनांक २८/०६/२०२१ रोजी अवघ्या चोवीस तासातच रुग्णालय सुरू करण्याचे आदेश व वैद्यकीय अधिकारी म्हणून श्रध्दा माडूरवार यांची नियुक्ती करण्यात आले होते मात्र २१ दिवस उलटून सुध्दा रुग्णालयात डॉक्टर हजर झाले नाही. येत्या बुधवार पर्यंत टेकामांडवा येथिल प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर हजर न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय ताब्यात घेण्यात येईल अशा इशारा शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींनीशी बोलताना दिला आहे.
परिसरातील जनतेला आरोग्याची सुविधा मिळावी या हेतूने पाच ते सहा वर्षां अगोदर लाखो रुपये खर्चून येथे आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात आली मात्र, कोणत्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. मात्र जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिनांक २८/०६/२०२१ ला आदेश पत्र काढून डॉ श्रध्दा माडूरवार यांची नियुक्ती करण्यात आली होती मात्र हे डॉक्टर येणास नकार देत आहेत यामुळे इमारत बांधून तशीच ओसाड पडून आहे. यामुळे परिसरातील सामान्य नागरिकांना आरोग्य सेवेपासुन वंचित राहावे लागत आहे.
 जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर मा.डॉ.राजकुमार गहलोत यांनी नियुक्ती आदेश काढून मा. डॉ.श्रध्दा माडूरवार यांच्याकडे या रुग्णालयाचे सुत्र सोपविण्यात आले होते पण डॉ.श्रध्दा माडूरवार रुग्णालयाचे सुत्र २१ दिवस उलटून सुध्दा रुग्णालयाचे सुत्र हातात घेण्यास नकार देत आहे. यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रुग्णालयाच्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना आणि परिसरातील नागरिकांना अखेर आरोग्य सेवेपासुन वंचित राहावे लागत आहे आहे.
                    जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सुचना देवूनही २१ दिवसांचा कालावधी लोटूनही कुठलीच दखल न घेतल्यामुळे आता निवेदन नाही तर सरळ हल्ला बोल असे म्हणत येणाऱ्या बुधवार ला टेकामांडवा येथिल प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात डॉक्टर हजर न झाल्यास जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालय ताब्यात घेऊ अशा इशारा शिवसेना महिला संघटीका सिंधुताई जाधव यांनी दिला आहे.
#Doctor

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत