Top News

महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण; राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदूभाऊ गट्टूवार #bajrangdal



(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- केंद्र सरकारच्या वतीने पेट्रोलियम पदार्थांचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत इतर इंधन दरवाढीच्या सोबत घरगुती गॅसच्या किमती मध्ये होत जाणारी वाढ ही गृहिणींचे बजेट कोलमडून टाकायला कारणीभूत ठरते आहे सर्वच क्षेत्रात महागाई वाढत असून जीवनावश्यक वस्तूंच्या किमती देखील आता गरिबांना परवडत नाहीत त्यामुळे वापरासह सर्वसामान्य जनतेचे गोरगरिबांची जगणे कठीण झाले आहे शासनाने वेळीच याचा विचार नाही केलास राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांना आंदोलन छेडावे लागेल असा इशारा यांनी दिला आहे सध्या डीझेल् 100 च्या जवळ आहे तर पेट्रोल ने 100 पार केलेली आहे गॅसचा दर की दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे एका बाजूला अच्छे दिन म्हणून असा दाखवून उज्वल गॅस च्या नावाने गॅस दिला खरा मात्र आता किमती प्रचंड वाढल्यामुळे रिफील करणे शक्य नसल्याने गोरगरीब महिलांनी पुन्हा जळतं लाकूड गवळ्या शोधायला सुरुवात केली आहे दूर मुक्त घर या संकल्पनेला पूर्णपणे कोलदांडा बसला आहे अच्छे दिन चे गाजर दाखवून गरिबांना देशोधडीला लावण्याचे काम केंद्र सरकार करत आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात सरकारच्या विरोधामध्ये जनमत तयार होत आहे लोकांना महागाईच्या खाईत लोटून टाकले जात आहे अशीही टीका नंदू भाऊ गट्टूवार यांनी केली आहे मध्यवर्गीय जनतेला दुचाकीवरून फिरणे देखील परवडत नाही आहे त्यामुळे कामाच्या गतीला मर्यादा येऊ लागल्या आहेत अगोदरच कोरोना महामारी च्या कारणाने लॉकडाऊन मध्ये मध्यमवर्गीय होरपळून निघाले आहे आणि आता पुन्हा महागाईचा भस्मासुर निर्माण केले गेला जात असल्यामुळे जनतेने जगाव की मरावे असा प्रश्न पडू शासनाने त्वरित महागाई कमी करावी अन्यथा येणाऱ्या काळात जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असे राष्ट्रीय बजरंग दल नेता नंदू भाऊ गट्टूवार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
#bajrangdal

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने