जाहिरात... Advertisement... विज्ञापन

फडणवीसांच्या ताफ्यातील गाडी अचानक पेटली. #Fire #Fadnavis


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या एका गाडीला अचानक आग लागली. सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही. #Fire #Fadnavis
देवेंद्र फडणवीस हे नागपूर येथून त्यांच्या मूळ गावी मूलकडे जात हेाते. काल सकाळी ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. चंद्रपूर-नागपूर जिल्ह्याच्या सीमेवरील नागभीड तालुक्यातील मोहाडी येथे फडणवीस यांच्या सुरक्षा पथकाच्या ताफ्यातील भरधाव वेगात असलेल्या पोलिसाच्या टीयूव्ही या गाडीने अचानक पेट घेतला. गाडीच्या बोनेटमधून धूर निघाल्याचे दिसताच चालकाने गाडी थांबवून गाडीतील सुरक्षा रक्षकांना तातडीने खाली उतरविले.
अचानक पेट घेतलेल्या गाडीमध्ये पाच जण बसलेले होते. बोनेटमधून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने तातडीने गाडी थांबवली. आतील सर्वांना खाली उतरविले, त्यानंतर थोड्याच वेळात आग भडकली. आग लागल्याची माहिती अग्निशमन विभागास देण्यात आली हेाती. मात्र, अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत गाडी जळून खाक झाली होती. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झालेली नाही. दरम्यान, या घटनेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी आपला पुढील दौरा सुखरूपपणे पूर्ण केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत