जिवती तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, व सदस्य यांना निरोप समारोह. #Jiwati

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनील राठोड, जिवती
जिवती:- तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीचे 5 वर्षे कार्यकाळ 31 जुलै, 2021 रोजी पूर्ण होत; असल्याने व अद्यापही कोरोना संकटामूळे ग्रामपंचायतच्या सार्वञिक निवडणूक जाहीर न झाल्यामूळे जिवती तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना संकटात ग्रामपंचायतीचे सर्वच पदाधिकारी आपापल्या ग्रामपंचायतीचे विकासाभिमूख कार्ये पार पाडले आहेत, त्यानी केलेल्या कार्याची दखल घेऊन व विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुदत संपलेल्या 21 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना निरोप देण्याकरीता राजुरा विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे यांच्या उपस्थितीत जिवती येथे निरोप समारोह चा कार्यक्रम आयोजित करण्यात आले 


सदर कार्यक्रमास तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य गण व कोरोना योद्धा म्हणून प्राथमिक आरोग्य केद्र जिवती चे डॉ नर्स परिचालक या संर्वाच शाल-श्रीफळ व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आल या वेळी राजुरा विधान सभा क्षेत्राचे माजी आमदार अँड संजय भाऊ धोटे जिल्हा परिषद सदस्य सौ गोदावरीताई केंद्रे सौ कमलताई राठोड जिवती पंचायत समिती उपसभापति मा.महेश भाऊ देवकते भाजपा महीला तालुका अध्यक्ष सौ अमृतवर्षा पुल्लेवाड भाजपा जिवती तालुका अध्यक्ष मा केशव गीरमाजी दत्ता राठोड सुरेशजी केंद्रे मनमंत वारे संजय केंद्रे बन्सी जाधव सचिन उत्तरवार नामदेव सलगर निजम भाई व २१ ग्रामपंचायचे सरपंच उपसरपंच व आरोग्य अधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.