(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कोरपना:- महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष, माजी मंत्री, लोकनेते आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनी दि.30.07.2021 रोजी भारतीय जनता पार्टी कोरपना च्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचा शुभारंभ माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. प्रामुख्याने या प्रसंगी तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, राजुरा विधान सभेचे समर्थ बूथ अभियानाचे बूथ विस्तारक सतीश उपलेंचवार, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गज्जलवार, रमेश पा. मालेकर, जिल्हा महिला आघाडीच्या उपाध्यक्ष सौ. इंदिरा कोल्हे, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने, जिल्हा सहकार आघाडीचे किशोर बावणे, नगरसेवक अमोल आसेकर, शशिकांत आडकीने, धानोली ग्रा. पं. चे सरपंच विजय रणदिवे, भाजयुमो अध्यक्ष ओम पवार, बालू पाणघाटे, अनिल कौरासे, विनोद नरेंदुलवार, वासुदेव आवारी, सुनील देरकर व मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सुधीरभाऊ च्या विकासकार्यावर व विशेषता कोरोना काळात राजकारणा पलीकडे जाऊन केलेल्या सेवाकार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला. रक्त संकलण डॉ. हेडगेवार रक्तपेढी नागपूर चे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल आसेकर यांनी केले व आभार प्रदर्शन आशिष ताजने यांनी मानले.
#Blooddonation