🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

मास्क घालूनच घराबाहेर पडा. #Mask


विनामास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मनपाने दिल्या नम्रतापूर्वक सूचना.

मनपा आयुक्त यांच्या मार्गदर्शनात मोहिम.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. त्यामुळे गाफिल न राहता संभाव्य तिसऱ्या लाटेसंदर्भात सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या लोकांचा कल मास्क न वापरण्याकडे दिसत आहे. त्यामुळे चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त श्री. राजेश मोहिते यांच्या सूचनेनुसार "मास्क’ची कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. बुधवार, ता. २८ जुलै रोजी महाकाली मंदिर मार्गावर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांना थांबवून नम्रतापूर्वक व सौजन्यतेने सूचना देण्यात आल्या. मास्क घालूनच घराबाहेर पडा, असे यावेळी सूचित करण्यात आले. #Mask
चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विपीन पालीवाल यांनी २७ जुलै रोजी दिलेल्या निर्देशानुसार "मास्क’ची कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. शहरी भागात दुकानांच्या वेळा ठरवून दिल्यानंतरही त्याचे उल्लंघन होताना दिसत आहे. चार वाजेनंतर संबंधित आस्थापने बंद झाली पाहिजे. त्यासाठी महानगर पालिकेच्या तिन्ही झोनच्या टीम पुन्हा सक्रीय कराव्यात, अशा सूचना अतिरिक्त आयुक्तांनी दिल्या.
बुधवारी (ता. २८ जुलै) महाकाली मंदिर मुख्य रस्त्यावर मास्क न वापरणाऱ्या नागरिकांविरुद्ध मोहीम राबविण्यात आली. नागरिकांनी घराबाहेर निघताना मास्क लावूनच निघावे, अशा नम्रतापूर्वक व सौजन्यतेने सूचना देण्यात आल्या. ही मोहीम वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) अमोल शेळके यांच्यासह झोनचे शिपाई यांच्या उपस्थितीत पार पडली. तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने नागरिकांनी मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मनपाचे आयुक्त राजेश मोहिते यांनी केले आहे.