भद्रावती तहसील कार्यालयात निवेदन सादर.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती: राज्यातील आघाडी शासनाद्वारे विविध धोरणे राबरून बहुजनांचा संविधानिक हक्क व अधिकार डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करीत राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाकडून दि.७ ते २६ जुलैपर्यंत वेगवेगळ्या स्तरावरील आंदोलन करण्यात येणार असून याचाच एक भाग म्हणून भद्रावती येथे संघाच्या शाखेद्वारे भद्रावती तहसील कार्यालयाचे नायब तहसिलदार यांना दि.७ जुलैला निवेदन सादर करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली.
सदर आंदोलन चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अशोक तुमराम, जिल्हा महासचिव धनराज गेडाम, कार्याध्यक्ष हर्षवर्धन भवरे, राज्य उपाध्यक्ष सौ.कविता चंदनखेडे, सदस्य मनोहर नागपुरे यांच्या नेतृत्वात ७ ते ११ जुलै पर्यंत काळी फीत लावून विरोध प्रदर्शीत करणे १२ जुलैला तालुकास्तरीय शासकीय कार्यालयासमोर धरणे व घंटानाद आंदोलन १९ जुलैला तालुकास्तरीय रॅली व बोंमाबोंम आंदोलन तर २६ जुलैला जिल्हास्तरीय रॅली काढून जिल्हाधिकरी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढने असे आंदोलनाची रूपरेषा आहे.
उद्योगाचे खाजगीकरण करून त्यातील बहुजनांचा आरक्षणासारखा हक्क डावलने शिक्षक सेवक, अंगणवाडी सेविका,आदिंकडून काम करवून घेणे.यासोबतच अनेक समस्या बहुजनांसमोर शासनाने निर्माण केले आहे.त्यामुळे बहुजनांचे न्याय हक्क आबाधित राखण्याकरिता हा आंदोलनाचा मार्ग उचलला गेला असल्याचे या कर्मचारी संघाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले आहे. त्यावेळी निवेदन सादर करतांना अशोक तुमराम, मनोहर नागपुरे आदी संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
#movement