(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- दोन आठवड्यापूर्वी स्विफ्ट डिझायर या चारचाकी वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या ६० वर्षीय इसमाची अद्याप ओळख पटली नसून पोलिस ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
प्राप्त माहितीनुसार दि.२४ जूनच्या रात्री ८.१५ वाजताच्या दरम्यान येथील नवीन बस्थानकाजवळ दुर्गापूर येथील भारतभूषण मोहन झाडे (२९) याने आपले वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालवून एका अज्ञात इसमास जोरदार धडक दिली. त्यात तो इसम गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे स्विट डिझायर कार क्र.
एम.एच.३१,डी.सी.३३९७ चालक भारतभूषण मोहन झाडे याच्या विरुद्ध दि.२५ जून रोजी भद्रावती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
मृतक इसम अंदाजे ६० वर्षे वयाचा असून निळा जिन्स पॅंट व पांढरा शर्ट घातलेला होता. हनुवटीवर पांढरी दाढी होती. अशा वर्णनाचा इसम कोणाचा ओळखीचा किंवा नातेवाईक असल्यास त्यांनी भद्रावती पोलिस ठाण्याशी दूरध्वनी क्र.०७१७५-२६५०९३ वर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलिस निरीक्षक व्ही. डी. मुळे यांनी केले आहे. #Accident