सभापती सुनील उरकुडे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत खामोना येथील लोकांना मिळणार पिण्याचे शुद्ध पाणी. #Rajura

Bhairav Diwase


माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते उद्घाटन.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- दिनांक 10 जुलै रोजी ग्रामपंचायत खामोना येथे आर ओ प्लांट चे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी आमदार सुदर्शन निमकर तर अध्यक्ष म्हणून जि. प. चंद्रपूर चे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुनील उरकुडे उपस्थित होते. #Rajura


       सरपंच हरी झाडे यांनी प्रस्तानणेतून विविध कामांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सभपतींचे आभार व्यक्त केले तर विकासकार्यात अशीच निरांतरता राखावी असे प्रतिपादन केले
             
      त्यानंतर अध्यक्षीय भाषणातून सभापती सुनील उरकुडेंनी आदर्श ग्राम पुरस्कार पटकविल्याबद्दल ग्रामपंचायत व गावकऱ्यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले व समोर गावकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात सहकार्याची सांगड अशीच कायम ठेवून गावचे नाव जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर पोहोचवावे त्यासाठी वरिष्ठ सभागृहाचे पदाधिकारी म्हणून सदैव आपण अशा होतकरू गावाच्या पाठीशी राहणार असा विश्वास गावकऱ्यांना दिला व अनेक महत्त्वाच्या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.श्री. हरिदास झाडे, सरपंच ग्रा.पं. खामोना, मा.सौ. शारदा तलांडे, उपसरपंच, ग्रा.पं. खामोना, ग्रामपंचायत सदस्य श्री. मारोती चन्ने, सौ.सोनी ठक, सौ.लक्ष्मी लोणारे, सौ.अलका वैद्य, कार्यक्रमास प्रमुख उपस्थित श्री.दिलीप गिरसावळे, अध्यक्ष, ग्राम विकास समिती, श्री.रामदास गिरसावळे माजी सरपंच, प्रतिष्ठित नागरिक श्री.पुंजाराम ठक, श्री.तुळशीराम तलांडे, श्री.वासुदेव लांडे, श्री.बाबुराव चन्ने, श्री.संतोष चन्ने, श्री.श्रावण विधाते, श्री. दिलीप वैद्य, श्री.शंकर लांडे, श्री.वामन लोहे, श्री.बंडू इसनकर, श्री.रामचंद्र जेऊरकर, श्री.रामकीसन गोखरे, श्री.अतुल चहारे, श्री.बापूजी क्षीरसागर, श्री.हरी लेडांगे, श्री.नवनाथ ठक, श्री.बापूजी बुटले, श्री.शामराव चन्ने, श्री.यशवंत चन्ने, श्री.सुधाकर पेटकर, श्री.वासुदेव मोरे, श्री.सुरेश लोहे, श्री.रविंद्र चन्ने, श्री.भारत कुळसंगे, श्री.नवनाथ मिलमिले, श्री. संजय बुटले, श्री.नामदेव लोणारे, सौ.वनिता विधाते, सौ.शांताबाई जेऊरकर, सौ.सुमन पोटे, सौ.वनिता माणुसमारे, सौ.शैला लोहे, सौ.वृंदा गिरसावळे, सौ.मीराबाई चन्ने, सौ.बिलनबाई गिरसावळे उपस्थित होते.