Click Here...👇👇👇

पाहुणी म्हणून आलेल्या आत्याची काठीने प्रहार करुन हत्या. #murder #death

Bhairav Diwase


(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
कुरखेडा:- तुळजाबाई चार-पाच दिवसापूर्वी आपल्या मुलीकडे कोटलडोह ता. कुरखेडा येथे पाहुणी म्हणून आली होती. दरम्यान, जावयाचा भाऊ असलेला तिचा भाचा आसाराम बिजाराम कुमरे याच्याशी जमिनीच्या विषयावरून आत्याचे भांडण झाले. यावेळी घरातील सर्व मंडळी शेतावर गेले होते. या भांडणात रागाच्या भरात आसारामने आत्या तुळजाबाईच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. यामुळे जबर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला. तुळजाबाई मंगू कल्लो (६० वर्ष) रा. मोहगाव, ता. कोरची असे मृत महिलेचे नाव आहे. #Murder #death
घरातील मंडळी शेतावरून सायंकाळी घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. या घटनेची तक्रार पुराडा पोलीस स्टेशनला तुळजाबाईची मुलगी अनुसया कुमरे यांनी दिली. त्यावरून आरोपीविरोधात भादंवि कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता उपजिल्हा रुग्णालय कुरखेडा येथे आणला. पुढील तपास प्रभारी अधिकारी दीपक शेळके, पोलीस हवालदार संतोष धोटे, नायक यशवंत जुमनाके, महिला अंमलदार प्रीती ठाकरे करीत आहेत. #murder #death